महाडिबीटी
पोर्टलवर शिष्यवृत्ती,
शिक्षण शुल्क, परिक्षा
शुल्क योजनेंतर्गत
सन
2020-21 साठी रिअपील
करणे व
2021-22 या शैक्षणिक
वर्षासाठी नवीन
अर्ज करण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडिबीटी (Mahabt) पोर्टल
राबविण्यात येत आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, फ्रिशिप योजनांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले जात आहेत.
त्यानुषंगाने जिल्हयातील सर्व शासनमान्य मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनु.जाती
, विमुक्त जाती, भटक्या, इतर प्रर्वगातील
विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, राजर्षी
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर
करणे या योजनेंतर्गत सन
2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी रि-अपील करण्यासाठी
व सन 2021-22 या वर्षासाठी नवीन अर्ज
करण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि.
14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आलेले आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याचा
अंतिम दि. 31 जानेवारी 2022 असून
जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती,
भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय
व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्तीचे अर्ज संकेतस्थळावर भरुन ते
ऑनलाईन पध्दतीने आपल्या महाविद्यालयाकडे फॉरवर्ड करावेत.
तसेच महाविद्यालयांनी सदरचे अर्ज छाननी करुन शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचेंच अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत होत असलेले अर्ज हे
महाविद्यालयाद्वारे या कार्यालयास प्राप्त होतात. परंतु यापैकी
नॅान आधार असलेले अर्ज हे देयक बनविण्यासाठी
पात्र होत नाहीत यात
नोंदणीकृत अर्ज NOT ALLOTED होण्याचे
प्रमुख कारण
हे नॉन
आधार अर्ज
असे आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्जांची ऑनलाईन तपासणी करत
असतांना सर्व महाविद्यालयानी भरलेल्या अर्जाचा प्रोफाईल प्रकार आधार बेस आहे की
नाही याची खात्री करुनच फारवर्ड करावा. तसेच नॉन
आधार अर्जाबाबत
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या बाबत अवगत
करावे.
तसेच ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नॉन आधार अर्ज
भरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आधार
क्रमांक अद्यावत करावा. तसेच आधार संलग्नीकृत बँक खाते आहे
की नाही याची खातरजमा https://residen.uidai.gov.in/bank-mapper
या लिंक द्वारे करुन घ्यावी.अशी सुचना
आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना देण्यात यावी, असे आवाहन
शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment