ज्येठ नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक
कक्षाची स्थापना
हिंगोली (जिमाका), दि. 23
: - सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-2013
ची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांचया समस्यांचे निवारण करण्यासाठी
सहायक आयुक्त समाज कल्याण , हिगोली यांच्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्षाची
स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या
समस्यांचे निवारण करण्यासाठी सहायक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली कार्यालयाशी संपर्क साधून आपले लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment