जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती केंद्रात
क्रीडा प्रशिक्षकाची निव्वळ मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रशिक्षकाला
प्रतीमहा 15 ते 25 हजार रुपये याप्रमाणे मानधन मिळेल. प्रशिक्षकांचा पर फॉर्मन्स आढळून
न आल्यास त्यास हिंगोली जिल्हास्तर खेलो इंडिया केंद्र नियंत्रक व देखरेख समिती कधीही प्रशिक्षक पदावरुन दूर करु शकेल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा. पात्रताधारक प्रशिक्षकांनी आपले अर्ज क्रीडा कार्यालयाच्या dsohingoli01@gmail.com या ई-मेल आयडीवर आणि
त्याची मूळ प्रत कार्यालयीन वेळेत हिंगोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात
दिनांक 10 जानेवारी, 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन
फारुखी यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment