युवा
मंडळ विकास कार्यक्रमाद्वारे
जिल्ह्यातील
50 गावांमध्ये युवा मंडळाची स्थापना
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील नेहरु युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेळ
मंत्रालय भारत सरकार अंतर्गत युवा मंडळ विकास कार्यक्रम दि. 7 डिसेंबर ते 12 डिसेंबर,
2021 या कालावधीत जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या
कार्यक्रमांतर्गत नेहरु युवा केंद्राच्या 10 स्वयंसेवकांनी जिल्ह्यातील 50 गावांमध्ये जाऊन युवा मंडळाची स्थापना
केली. यासाठी गावातील युवक व सरपंच यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये
गावाच्या विकासासाठी युवकांची काय जबाबदारी आहे. तसेच युवक मंडळ स्थापन करुन युवक आपल्या
गावाचा कशा प्रकारे विकास करु शकतो या विषयावर चर्चा झाली.
*****
No comments:
Post a Comment