16 December, 2021

 

हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

 

              हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 च्या नियम 335 नुसार निवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षी दि. 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हा हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात. त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो. हा हयातीचा दाखला सादर करण्यासाठी दि. 31 डिसेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

             निवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांच्या बँकेशी संपर्क करावा व ज्या निवृत्ती वेतन धरकांना आयकर कपात केला जातो त्यांनी त्यांच्या आयकराची परिगणना जुन्या किंवा नवीन नियमाप्रमाणे कपात करण्याबाबत कोषागारास अवगत करण्यात यावे, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांना केले आहे.

*****

No comments: