06 December, 2021

 

जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 :  युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तर्फे ग्रामीण युवा मंडळांना स्वयंप्रेरणेने ग्रामीण भागात समाजकार्य व विकासाचे कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी नेहरु युवा केंद्रामार्फत जिल्हा युवा मंडळ पुरस्कार देण्यात येते. निवड झालेल्या मंडळाला 25 हजार रुपये व प्रशस्ती पत्र देण्यात येते. या पुरस्कारासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या निवड समितीतर्फे एकाच मंडळाची  निवड केली जाते.

नेहरु युवा केंद्र, हिंगोली या कार्यालयासोबत संलग्न तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारा नोंदणीकृत झालेल्या 18 ते 29 वयोगटातील युवा मंडळांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहिती जिल्हा नेहरु युवा केंद्र कार्यालयात उपलब्ध आहे.

जे मंडळ सन 2020-21 मध्ये प्रामुख्याने आरोग्य व कुटुंब कल्याण, पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, साक्षरता, महिला सशक्तीकरण , लोककला व क्रीडा, रोजगार निर्मिती, श्रमदान, सामाजिक समस्याबद्दल मोहिम, समाज कल्याण, स्वच्छता अभियान, इतर क्षेत्रात सक्रीय कार्यरत आहेत, अशा जिल्ह्यातील नोंदणीकृत व  नेहरु युवा केंद्र हिंगोली सोबत संलग्न असलेल्या युवक व महिला मंडळानी जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, 42/1 नाईक नगर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, हिंगोली  येथे दि. 10 डिसेंबर, 2021 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा नेहरु युवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

*****

No comments: