09 August, 2023

 

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जागेवरच निवड संधी मोहिमेतून

06 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची निवड

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आज दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या रोजगार मेळाव्यात क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि.नागपूर, स्वतंत्र मायक्रो फायनान्स औरंगाबाद या आस्थापना/कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. जागेवरच निवड संधी या विशेष मोहिमेअंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 37 उमेदवार उपस्थित होते. या 37 उमेदवारांपैकी 06 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी व करिअर कसे निवडावे याबाबत माहिती देण्यासाठी नॅशनल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली येथे करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म. शां. लोखंडे, न. द. टोनपे, रा. द. कदम, म. ना. राऊत, अ. अ. घावडे, रा. द. कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव यांनी परिश्रम घेतले.

**** 

No comments: