18 August, 2023

 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषि पायाभूत निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी

कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


हिंगोली (जिमाका),  दि. 18 : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथील कयाधु फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत अंतर्गत कृषी पायाभूत निधी (AIF) योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रचार-प्रसार व लाभार्थी नोंदणीसाठी कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील कुंभरे व कृषी अधिकारी उमेश चौधरी, जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, मुल्यसाखळी तज्ञ गणेश कच्छवे, अर्थतज्ञ तथा वित्तीय सल्लागार जितेश नालट यांनी कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) योजने अंतर्गत वेब पोर्टलवर अर्ज कसा करावा, कोणत्या व्यवसायासाठी लाभ घेता येतो याची माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 3 टक्के व्याज सवलतीचा लाभ कसा मिळतो याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

            या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक निलेश पतंगे यांच्यासह इतर संचालक व शेतकरी उपस्थित होते.

****

No comments: