सामाजिक न्याय विभाग हिंगोली येथे
साहित्यरत्न
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची जयंती
उत्सहात साजरी
हिंगोली, (जिमाका) दि. 01 : साहित्यरत्न लोकशाहिर
अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभाग हिंगोली येथे
सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त, शिवानंद मिनगीरे यांनी साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी व कार्यालय अधीक्षक सत्यजीत नटवे,
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद यांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी हिंगोली जिल्हयातील सामाजिक
न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणा-या 04-मुलींचे शासकिय वसतिगृहे, 04-मुलांचे
शासकिय वसतिगृहे व 01-मुलींची शासकिय निवासीशाळा तसेच इतर मागास बहुजन कल्याण
विभागाअंतर्गत 20 विजाभज आश्रमशाळेत
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
व व्याख्यानाचे आयोजन करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
*****
No comments:
Post a Comment