स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषि पायाभूत निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी
हट्टा फाटा येथील कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 22
: जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील
हट्टा फाटा येथील हट्टावाला फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत अंतर्गत
कृषी पायाभूत निधी (AIF) योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रचार-प्रसार व लाभार्थी नोंदणीसाठी
कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अंमलबजावणी नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, MIS तज्ञ बालाजी
मोडे, CBO संचालक जोहेब सिद्दीकी, वखार महामंडळाचे प्रतिनिधी बाळासाहेब पवार, सभासद
उत्तम शिंदे यांनी कृषि पायाभूत सुविधा निधी (AIF) योजने अंतर्गत वेब पोर्टलवर अर्ज
कसा करावा, कोणत्या व्यवसायासाठी लाभ घेता येतो याची माहिती दिली. तसेच या योजनेचा
लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 3 टक्के व्याज सवलतीचा लाभ कसा मिळतो याविषयी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी मोठ्या
संख्येने शेतकरी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment