13 August, 2023

 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

▪️शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह प्रत्येक नागरिकांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घ्यावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका) दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्वानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचा उपक्रम संपन्न होत असतांना "हर घर तिरंगा" हे अभियान हिंगोली जिल्ह्यात दि. 13 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे राबविण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दि. 13 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत भारतीय ध्वज संहितेच्या अधिन राहून आपण आपल्या घरावर राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकविण्यात यावा, राष्ट्रध्वज फडकवितांना राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.                      

उपरोक्त प्रमाणे "हर घर तिरंगा हे अभियान प्रत्येक शासकीय कार्यालयात अनिर्वायपणे राबविण्यात यावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि निमशासकीय संस्था, खाजगी संस्था, सर्व महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पितळे, सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी "हर घर तिरंगा" हे अभियान अंतर्गत वरील कालावधीत राष्ट्रध्वज फटकविण्यात यावा. "हर घर तिरंगा' हे अभियान उत्स्फूर्तपणे राबविण्यासाठी याद्वारे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे. 

*****

No comments: