गेल्या
नऊ वर्षांच्या कालखंडातील केंद्र सरकारच्या देशाच्या सार्वांगिन कार्याची
माहिती
घेण्यासाठी प्रदर्शनास जनतेनी भेटी द्याव्यात
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील, केंद्रीय संचार ब्यूरोच्या(Central
Bureau of Communication) वतीने व राज्य शासन
आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर,संस्थान औढा
नागनाथ यांच्या सहकार्याने, भक्त निवास,क्र. 2 नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर औढा नागनाथ येथे ३ दिवसांकरिता मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन
भरविणयात आले आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील,
केंद्रीय संचार ब्यूरोच्या(Central Bureau of Communication) वतीने व राज्य शासन आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर,संस्थान औढा नागनाथ यांच्या सहकार्याने, भक्त
निवास,क्र. 2 नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर औढा नागनाथ येथे ३ दिवसांकरिता मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन
भरविणयात येत आहे. या ठीकाणी एलईडी स्क्रीनच्या माध्यामातून सरकाच्या योजनांची माहितीही
देण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसिलदार तथा अध्यक्ष नागेश्वर जितिर्लिग
मदिर संस्थान, विठ्ठल परळीकर,नादेंड येथील नगर रचना विभागाचे सहायक संचालक, पी.एल अलुरकर,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा गोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती इंगळे,
तालूका पशूसंवर्धन अधिकारी डॉ. जेजेराम केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय निलावार,
नागेश्वर ज्योतिर्लिंग संस्थांचे अध्यक्ष वैजनाथ पवार, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी
अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारने जनतेच्या विकासाबरोबरच त्यांना
विविध योजनांची माहिती व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व योजना आनलाईन केल्या
आहेत तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट वित्तीय सहाय देण्यासाठी डीजिटल व्यवस्था अत्यंत
बळकट केली असेल्याचे ते म्हणाले,
शासनाच्या
विविध योजनांचा लाभ जनतेपर्यत पोहचवण्यासाठी सर्व प्रशासकीय व्यवस्था सज्ज असल्याचे
पापळकर यांनी सांगितले.
हे प्रदर्शन दिनांक ते
20 ते 22 ऑगस्ट,2023 दरम्यान सकाळी 8 ते रात्री
8 पर्यंत सर्वांसाठी मोफत खूले राहणार आहे,
या चित्र प्रदर्शनात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या वतीने स्टाल्सच्या माध्यमातून
विविध योजनांची माहिती आणि सेवा देण्यासाठी
सामान्य जनता व भाविकांची आरोग्य तपासणी बरोबरच पशु संवर्धन विभागाद्वारे जनावरांच्या
आरोग्याची तसेत विविध आजारांसंबंधी औषधोपचाराची
माहिती देण्यासाठी स्टाल उभारण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाद्वारे आंगणवाडी
कार्यकर्त्यानी सकस आहार, तृनधान्यांपासून तयार
केलेले आरोग्यदायी व रुचकर पदार्थ तसेच रानभाज्यांचे प्रदर्शन भवविले असून हे
प्रदर्शन सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे.
केंद्र सरकाच्या सेवेला 9 वर्ष पुर्ण
झाल्यानिमित्त मेरी माठी मेरा देश अभियानाच्या
औचित्याने केंद्र सरकारची 9 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची या संकल्पनेवर
अधारित सरकारच्यावतीने संपूर्ण देशभरात विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली
भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली उलेखणीय कामगिरी आणि देशाचा जलदगतीने केलेला विकास
तसेच जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती या मल्टीमिडीया प्रदर्शातच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
या प्रदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक
आणि भाविकांनी भेट देण्याचे आवाहन प्रसिध्दी
अधिकारी, माधव जायभाये, व सहायक प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment