04 August, 2023

 

डाक विभागामार्फत आयोजित ‘ढाई आखर’ पत्र लेखन स्पर्धेत

भाग घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि.4 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्र लेखन स्पर्धा ढाई आखर या शिर्षकाखाली आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये पत्राचा विषय ‘Digital India for New India / डिजिटल भारतामधून नवीन भारतनिर्माण’ असून सदरील विषयावर पत्र लिहावयाचे असून पत्र कोणत्याही भाषेमधून लिहण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ही पत्र लेखन स्पर्धा वर्ष वर्ष 18 पर्यंत एक गट व वय वर्ष 18 वर्षावरील दुसरा गट याप्रमाणे दोन गटात विभागलेली असणार आहे. त्याकरीता स्पर्धकांनी दिनांक 01 जानेवारी, 2023 रोजी माझे वय 18 वर्षापेक्षा कमी/जास्त आहे असा स्पष्ट उल्लेख करावा लागणार आहे. तसेच आपले नांव, पत्ता व वयाचा उल्लेखही करावा. सदरचे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या नावाने लिहून जवळच्या टपाल पत्रपेटीत किंवा जवळच्या टपाल कार्यालयात द्यावयाचे आहे. पाकीटातून पत्र पाठविण्याची शब्द मर्यादा एक हजार शब्द असून व अंतर्देशीइय पत्रासाठी 500 शब्दाची मर्यादा आहे.  पत्र पाठविण्याची शेवटची दिनांक 31 ऑक्टोबर, 2023 असून यानंतर पाठवलेल्या पत्रांचा सदरील पत्रलेखन स्पर्धेमध्ये समावेश करण्यात येणार नाही. 

वय वर्ष 18 पेक्षा कमी वय असलेल्या गटासाठी पाकीट आणि अंतर्देशीय अशा दोन विभागातून तसेच वय वर्ष 18 पेक्षा जास्त असलेल्या गटासाठी देखील पाकीट व अंतर्देशीय अशा दोन विभागातून याप्रमाणे चार प्रथम, चार द्वितीय व चार ततीय क्रमांक निवडल्या जाणार आहेत. वरील प्रमाणे निवडलेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक रुपये 25000/-, द्वितीय पारितोषिक रुपये 10,000/-  आणि तृतीय पारितोषिक रुपये 5000/- प्रदान करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रत्येक गटातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट पत्रांना राष्ट्रीय स्तरावर पाठविण्यात येईल आणि राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी अनुक्रमे प्रथम पारितोषिक रुपये 50,000/-, द्वितीय पारितोषिक रुपये 25,000/- आणि तृतीय पारितोषिक 10,000/- अशा रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

तरी भारतीय डाक विभागामार्फत आयोजित ढाई आखर या राष्ट्रीय लेखन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन परभणी विभागाचे डाक अधिक्षक मोहम्मद खदीर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

****

No comments: