07 August, 2023

 

जिल्हा परिषद अंतर्गत गट-क सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी

ऑनलाईन अर्ज करावेत

                                                                                                             

  हिंगोली (जिमाका), दि. 07 : येथील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क सरळसेवा-2023 अंतर्गत 204 रिक्त पदे भरती करण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या संकेतस्थळावर दि. 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. भरतीसंदर्भात संपूर्ण सखोल जाहिरात हिंगोली जिल्हा परिषदेच्या zphingoli.in व hingoli.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक व सदस्य जिल्हा निवड समिती संजय दैने यांनी कळविले आहे.

या पदभरती प्रक्रियेत आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के- 05 पदे, आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी-14, आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला)-112, औषध निर्माण अधिकारी-04, कंत्राटी ग्रामसेवक-10, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रामीण पाणी पुरवठा)-17, कनिष्ठ आरेखक-03, कनिष्ठ लेखा अधिकारी-01, कनिष्ठ सहायक-04, कनिष्ठ सहाय्यक लेखा-02, मुख्य सेविका/पर्यवेक्षिका-05, पशुधन पर्यवेक्षक-09, रिगमन (दोरखंडवाला)-01, लघुलेखक (निम्न श्रेणी)-01, वरिष्ठ सहायक लेखा-02 आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)-14 असे एकूण 204 संवर्गनिहाय घोषित केलेली सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे अनंतकुमार कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र), जिल्हा परिषद, हिंगोली यांनी कळविले आहे.

*******

No comments: