03 August, 2023

 

भटक्या विमुक्त जमाती आणि आदिवासी समाजातील मतदारांचे नाव

 मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी जिल्हास्तरावरुन विशेष अभियान

 

       हिंगोली, दि.3 : मा. मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दुर्गम  

          भागातील भटक्या विमुक्त जमाती / आदिवासी समाजातील मतदारांचे नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हास्तरावरुन विशेष अभियान  राबविणे बाबत निर्देशीत केले आहे. तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती ह्या स्वातंत्र्य काळापासून शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आणि अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याबाबतही सुचना दिल्या आहेत.

                        त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमाती आणि आदिवासी समाजातील ज्या बांधवांचे नाव मतदार यादीत नाही तसेच अन्य शासकीय विविध योजनांचा लाभ देण्याकरीता भटक्या विमुक्त जाती व आदिवासी समाजातील समाज सेवकांनी तसेच समाजासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांनी याबाबतची माहिती संकलीत करुन ती माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसिल कार्यालय किंवा उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी साईनाथ जगन्नाथ शिंदे (मो. 9881540708) रा. कोथळज ता.जि. हिंगोली यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.  

*****

 

 

No comments: