17 August, 2023

 

सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व.राजीव गांधी यांची जयंती

18 ऑगस्ट रोजी साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका),दि. 17 :  भारत सरकारच्या क्रीडा व युवक मंत्रालयाने दि. 10 ऑगस्ट, 2023 च्या पत्रान्वये रविवार, दि. 20 ऑगस्ट, 2023 ऐवजी शुक्रवार, दि. 18 ऑगस्ट, 2023 रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित केले आहे.

वरील दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 14 ऑगस्ट, 2023 च्या परिपत्रकान्वये शुक्रवार दि. 18 ऑगस्ट, 2023 रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे सूचित केले आहे.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शुक्रवार दि. 18 ऑगस्ट, 2023 रोजी सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेणे व स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

******

No comments: