कृषि
पायाभूत निधी योजनेच्या घडीपत्रिकेचे
स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर
यांच्या हस्ते विमोचन
हिंगोली (जिमाका), दि.
29 : मा.बाळासाहेब
ठाकरे कृषिव्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या विभागीय अंमलबजावणी कक्षाचे
विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा अमलबजावणी
कक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज आढावा बैठक घेण्यात
आली.
यावेळी जिल्हा अमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक
(आत्मा) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृषि पायाभूत निधी योजना (AIF) अंतर्गत घडीपत्रिकेचे
विमोचन स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या हस्ते करण्यात
आले. तसेच याप्रसंगी विभागीय नोडल अधिकारी
भास्कर कोळेकर यांनी शेतकरी उत्पादक
कंपनी (CBO) यांच्या कामाचा
आढावा घेऊन त्यांना येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील यावर मार्गदर्शन
केले.
यावेळी लातूर येथील विभागीय एमआयएस तज्ञ बाबासाहेब
वीर, जिल्हा अंमलबजावणी नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, मूल्य साखळी
तज्ञ गणेश कच्छवे, अर्थतज्ञ
तथा वित्तीय सल्लागार जितेश नालट, एमआयएस तज्ञ बालाजी मोडे, लेखापाल मोहिब शेख, संगणक
चालक अजय चक्के, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी (CBO) चे संचालक प्रमुख उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment