जिल्ह्यात 13
ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेचे आयोजन
नागरिकांनी
आपल्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात दि.
13 ऑगस्ट ते दि. 15 ऑगस्ट, 2023 या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या सुचनेनुसार हर घर
तिरंगा ही मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था,
शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन
आपल्या स्वत:च्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment