खरीप
पीक कर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली
(जिमाका), दि. 10 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2023-24 च्या खरीप पीक कर्जाचे जून
अखेरपर्यंत जास्तीत पिक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे
निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा
अग्रणी बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हास्तरीय
समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक पंकज बोरकर, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी
बोईले, विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर
म्हणाले, चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट 874.99 कोटी रुपयाचे असून
आतापर्यंत 61 हजार 778 खातेदारांना 452.18 कोटी रुपयाचे वितरण केले आहे. त्याची
टक्केवारी 51.68 टक्के झाली आहे. सर्व बँकानी जास्तीत जास्त पीक कर्जाचे वितरण
करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया
उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासह विविध योजनेच्या प्रलंबित प्रकरणाचा
तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश दिले.
******
No comments:
Post a Comment