आदिवासी लाभार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी
फोन लावत असल्यास
तात्काळ प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा
हिंगोली (जिमाका), दि. 01 : न्युक्लिअस
बजेट योजनेंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध
योजनांच्या त्रुटीच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या. त्रुटीची माहिती
लाभार्थ्याना व्यापक स्वरुपात व्हावी या उद्देशाने या त्रुटीच्या याद्या सोशल
मिडियावर प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.
काही
ठिकाणावरुन लाभार्थ्यांना त्रुटीची पूर्तता करणे, निवड करुन देणे, जीएसटी बील देणे
याबाबत कोणी फोन लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कोणी फोन लावत असतील तर
याबाबत तात्काळ प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. लाभार्थ्यांनी या अमिषाला बळी
पडू नये. जर आपण प्रकल्प कार्यालयाशी संपर्क न साधता परस्पर कोणताही व्यवहार
केल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.
हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment