संत रोहिदास
चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत
केंद्र
शासनाच्या एनएसएफडीसी नवीन योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाला सन 2023-24 या
आर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या योजनांचे भौतिक उदिष्ट प्राप्त झाले आहे.
यामध्ये मुदती कर्ज योजना 2, महिला समृध्दी योजना नवीन 10, लघुऋण वित्त योजना नवीन
10 व महिला अधिकारिता योजना 2 याप्रमाणे उदिष्ट प्राप्त झाले आहे. वरील सर्व योजना
एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविल्या जातात. चांभार समाजा अंतर्गत
असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील
लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी
महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या
नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज दि. 18 सप्टेंबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार हिंगोली या ठिकाणी स्वतः
अर्जदाराने मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत
कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.
कर्ज प्रस्ताव सादर करताना सक्षम
अधिकाऱ्याकडून घेतलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला अर्जदाराच्या
कुटुंबाचा उत्पन्नाचा चालू वर्षांचा दाखला, नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज
फोटोच्या तीन प्रती, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, राशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड,
मतदान कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स, व्यवसायाचे दरपत्रक जी.एस.टी.चे (कोटेशन),
व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी
हक्काचा पुरावा(नमुना नं.8), लाईट बिल, टॅक्स पावती, मुदती कर्ज योजनेसाठी प्रकल्प
अहवाल, व्यवसायाचे ग्रामपंचायत/नगर परिषद यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र
तसेच अनुभवाचा दाखला. लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्याचा सिबील
क्रेडिट स्कोअर रिपोर्ट 500 च्या वर असावा, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र,
रहिवाशी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.
हिंगोली जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार
युवक, युवतीनी तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन
अरुण सि. राऊत, जिल्हा व्यवस्थापक, हिंगोली यांनी केले आहे
*****
No comments:
Post a Comment