14 August, 2023

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त 47 व्या कलमाचा नागरिकांमध्ये प्रचार

 


 

                हिंगोली (जिमाका), दि. 14 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त नशामुक्त भारत अभियान समिती अंतर्गत, संविधानातील 47 व्या कलमाचा प्रचार आणि प्रसार वसमत येथील सार्वजनिक ठिकाणी आज दि. 14 ऑगस्ट सोमवारी पार पाडले.

       जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेतील चौथ्या भागातील मार्गदर्शक तत्व संविधानातील सत्तेचाळीसाव्या कलमाची नागरिकांना उजळणी माहिती देण्यात आली.

                सार्वजनिक वैयक्तीक आरोग्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थांपासून दूर राहून व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या जिल्हा अध्यक्षा शुभदा सरोदे यांनी व्यक्त केले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यकृत चित्र प्रदर्शनी पार पडले. व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत पत्रके वितरित करण्यात आले. यावेळी व्यसनमुक्ती संकल्प घेण्यात आला. समर्पित सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले.

या उपक्रमाचे नशामुक्त भारत अभियान समितीचे सचिव तथा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आर.एच.एडके यांनी स्वागत केले. प्रारंभी बुधवार पेठेतील गंगाप्रसादजी अग्रवाल सर्वोदय कार्यालयात  तत्कालीन स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. उपक्रमात  कृष्णा जाधव, वरद राऊत भावी पिढीतील ज्ञानेश्वर पडोळे, व्यंकट देशमुख, यश खाकरे, देवराज हिरवे, वेदांत मोहिते, समीर कुरेशी, मोहम्मद सोहान, अनिकेत मोहिते, फरहान सय्यद हसन, कृष्णा काळे, संचित डाढाळे, मोहित जाधव, गणेश ठाकरे आदिंनी सहभाग घेतला. 

******

No comments: