“मेरी माटी मेरा
देश” अभियान अंतर्गत
कळमनुरी पंचायत समितीमध्ये शिलाफलकाचे लोकार्पण
हिंगोली (जिमाका), दि.
09 : स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता
सोहळ्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मेरी माटी मेरा देश अभियान
अंतर्गत पंचायत समिती कळमनुरी येथे शिलाफलक तयार करण्यात आले आहे. याचे लोकार्पण
आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देनै यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी पंचप्रण
शपथ सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली व पंचायत
समिती परिसरात 75 देशी वृक्ष रोपांची लागवड करुन वसुधावंदन तयार करण्यात आले.
या
कार्यक्रमास पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे व गट विकास
अधिकारी प्रदीप बोंढारे, सहा.गट विकास अधिकारी विष्णु भोजे, बाल विकास अधिकारी धापसे
, गट शिक्षण अधिकारी नांदे, विकास पाईकराव, झरकर, सुभाष भुरके, आर.डी.कुलकर्णी,
सहायक प्रशासन अधिकारी अनिल धुळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मिसलवार, सहायक लेखा
अधिकारी हिबारे तसेच कळमनुरी पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित
होते.
*****
No comments:
Post a Comment