जिल्ह्यातील
सर्व नवउद्योजकांनी निर्यातीमध्ये वृध्दी करुन
हिंगोली
जिल्हा एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करावा
-
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यातील
सर्व नवउद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी यांनी या
कार्यशाळेचा लाभ घेऊन आपल्या निर्यातीमध्ये वृध्दी करावी व हिंगोली जिल्हा
एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समारोपीय
भाषणात केले.
हिंगोली
जिल्हयातील उद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या निर्यात क्षमता
वृध्दीसाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत निर्यातबंधू
योजनेअंतर्गत एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
अध्यक्षेतेखाली व नागपूरच्या विदेश व्यापार महानिदेशालयाच्या (DGFT )
सहाय्यक महासंचालक स्नेहल ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 31 जुलै, 2023
रोजी येथील जिल्हा नियोजन सभागृहात
घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, पोस्टाचे डाक
अधीक्षक मोहम्मद खदीर, बँक ऑफ महाराष्ट्राचे रतन मंडल, हिमांशू सिंग, जिल्हा
औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, प्रवीण सोनी, जिल्हा ॲग्रणी बँकेचे
अधिकारी धनाजी बोईले, आयसीआयबीचे
उपाध्यक्ष राजन ठक्कर, संस्थापक अध्यक्ष सौम्य अग्रवाल, नांदेड उपविभागीय अधिकारी
कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
विदेश व्यापार
निदेशालयाच्या सहायक महासंचालक स्नेहल ढोके यांनी DEH (DISTRICT EXPORT HUB) चे
महत्व स्पष्ट केले. त्यांचे सादरीकरण सोपे आणि विशेषतः नवीन निर्यातदारासाठी
केंद्रीत आहे. स्थानिक उद्योजकांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. यावेळी
श्रीमती ढोके यांनी DGFT नागपूरच्या व्हीसी लिंक बद्दल देखील सांगितले. ज्याद्वारे
निर्यातदार आणि नवीन येणाऱ्यांचे प्रश्न थेट DGFT द्वारे सोडविले जाऊ शकतात. स्थानिक
निर्यातदारासमोरील आव्हानावर चर्चा करण्यात आली आणि भविष्यातही असे वर्कशॉप होणार
आहेत, असे श्रीमती ढोके यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोस्ट
खात्याचे परभणी विभागाचे अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी पोस्ट खात्यामार्फत निर्यातदारांसाठी
असणाऱ्या योजना बाबतच्या माहितीचे सादरीकरण केले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे एजीएम रतन
मंडल व क्षेत्रीय अधिकारी हिमांशु सिंग यांनी निर्यातदारांसाठी बँकेकडून देण्यात
येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
या कार्यशाळेत
IEC रजिस्ट्रेशन करण्याबाबतचे व्हिडीओ सादरीकरण, MSME च्या योजना Custom नियमावली,
ROLE OF CHA (Customs House Agent), DGFT मार्फत निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या
योजना/ अनुदान, E-COMMERCE बाबत सविस्तर सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी DGFT नागपूरचे प्रतिक
गजभिये, जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक एस. ए. कादरी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन DGFT च्या सोनाली मोराई यांनी केले. कार्यक्रमास
जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment