नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 07 : उपप्रादेशिक
परिवहन कार्यालय हिंगोली व जिल्हा शलचिक कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने
हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दि. 8 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित
करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते
होणार आहे.
परिवहन आयुक्त
महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी या नेत्र
तपासणी शिबिरामध्ये सर्व वाहनचालकांची सर्वंकष नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी केली जाणार
आहे. यामध्ये आवश्यक असणाऱ्या वाहनचालकांसाठी मोफत चष्म्याचे देखील वाटप करण्यात येणार
आहे. या शिबिराअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत सेनगाव या तालुक्यात देखील
आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील
सर्व वाहन चालकांनी या तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment