जिल्हाधिकारी
कार्यालयात ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत
घेण्यात आली ‘पंचप्रण शपथ’
हिंगोली (जिमाका), दि. 09 : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान आज दि. 9 ऑगस्ट,
2023 पासून सुरु
झाले आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता येथील
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पंचप्रण शपथ
घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करु.
गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु.
भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करण्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक
म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु’ ही पंचप्रण शपथ उपस्थित सर्व
अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा आज, 09 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी-मेरा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. देशासाठी
बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे
अभियान राबविण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर,
उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment