अपघाताचे प्रमाण थांबविण्यासाठी वाहनचालकांनी
आपले मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्ह्यातील वाढते अपघाताचे प्रमाण थांबविण्यासाठी
वाहनचालकांनी आपले मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील जिल्हा रुग्णालयात उप्रप्रादेशिक
परिवहन अधिकारी कार्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वाहनचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी
व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोरे,
डॉ. फैजल खान, डॉ. मानका, नेत्ररोग तज्ञ किशन लखमावार, त्वचारोग तज्ञ डॉ. शिवाजी गिते,
सहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगीरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
जिल्ह्यातील वाढते अपघाताबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांचे
संतुलित आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, नियमित सवयी या विषयावर मार्गदर्शन केले. नेत्र
व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा
रुग्णालयाचे अभिनंदन केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी
वाहनचालकास भेडसावणाऱ्या विविध आरोग्य समस्या यामध्ये डोळ्याचे आजार,मणक्याचे आजार,
त्वचेचे आजार इत्यादी बाबीवर मार्गदर्शन करत वाहनचालकाशी हितगुज साधले. सर्व वाहनचालकांनी
जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
त्वचारोग तज्ञ डॉ. शिवाजी गिते यांनी
वाहनचालकांना भेडसावणाऱ्या त्वचा रोगाबाबत मार्गदर्शन करताना वाहनचालकांनी सैल कपडे
घालावे, दररोज स्नान करावे इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. नेत्ररोग तज्ञ डॉ. किशन
लखमावार यांनी डोळ्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक
प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी वाहनचालकाचे नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे
दि. 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर कळमनुरी
येथे 9 ऑगस्ट, वसमत येथे 10 ऑगस्ट आणि सेनगाव येथे 11 ऑगस्ट, 2023 रोजी आयोजन करण्यात
येणार आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहनचालक, मालवाहतूक वाहनचालक या
संर्वानी घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी उप्र प्रादेशिक परिवहन कार्यालयातील
सहायक मोटार वाहन निरीक्षक सर्वश्री. प्रमोद गोटे व अतुल बानापुरे यांनी उपस्थित वाहन
चालक व नागरिकांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन व समुपदेशन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
मोटार वाहन निरीक्षक सर्वश्री. जगदीश माने, शैलेशकुमार कोपुल्ला, आशिक तडवी, नलिनी
काळपांडे व इतर सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी,
कर्मचारी यांनी सहकार्य केले.
*****
No comments:
Post a Comment