स्वातंत्र्य
दिनी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व आरोग्य संस्था,
शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच आपल्या अधिनस्त
कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने
तंबाखू विरोधी दिनाची शपथ घेऊन जनजागृती करावी.
तसेच दि. 15
ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ग्रामसभेत प्रत्येक गावच्या आशा,
एएनएम, एमओ मार्फत एनसीडी कार्यक्रमाविषयी , तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी तसेच
तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा
रुग्णालय, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment