09 August, 2023

 

जिल्हा परिषदेमध्ये ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत

घेण्यात आली ‘पंचप्रण शपथ’

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 09  : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान आज दि. 9 ऑगस्ट, 2023 पासून सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये  पंचप्रण शपथ घेण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकलप संचालक नामदेव केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, सुधीर ठोंबरे व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहून पंच प्रण शपथ घेतली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत विभागाने नियोजन केले असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विघ्णू भोजे यांनी केले.

******

No comments: