समाज कल्याण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या
नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था, समाजसेवक यांनी
पुरस्कारासाठी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका),
दि. 06 : समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था
व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुषंगाने
सन 2019-20, 2020-21, 2021-22, व सन 2022-23
या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या खालील पुरस्कारासाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत. तथापि सन
2019-20, 2020-21, 2021-22 या वित्तीय वर्षासाठी
अर्ज केला आहे, त्यांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यांनी
चालु वर्षाचे पोलीस विभागाचे चारित्र्य
पडताळणी अहवाल तात्काळ सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाडे सादर करावे. उपरोक्त कालावधीसाठी पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज
केल्यास त्या अर्जाचाही विचार करण्यात येईल. ज्या वर्षांसाठी व ज्या पुरस्कारांकरिता अर्ज
करण्यात येत आहे त्या वर्षासाठी त्या पुरस्कारासाठी विहित केलेल्या
अटींची पुर्तता करणे आवश्यक राहील. तसेच
पुरस्कारासाठी दिनांक 01 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल.
उदा. सन 2019-20 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 असा विचारात
घेण्यात येईल.
विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण,
हिंगोली यांच्याकडे उपलब्ध आहे. अधिक
माहितीसाठी या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक एन. जी. राठोड (9890855764) यांच्याशी
संपर्क साधावा. तसेच पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छूक संस्था व व्यक्ती यांनी सदरहू पुरस्कार संदर्भात
संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली कार्यालयाकडे
दिनांक 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत अर्ज करावा,
असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली
यांनी केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment