नागरिकांनी महसूल सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमांचा
लाभ घ्यावा.
-
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 2 : राज्य शासनाच्या आदेशान्वये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान
महसूल सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या सप्ताहनिमित्त युवा संवाद, एक हात मदतीचा,
जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद असे विविध कार्यक्रम
आयोजित केले जात आहेत. या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने दि. 02 ऑगस्ट, 2023 रोजी तहसील
कार्यालय, हिंगोली येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय दैने, अपर जिल्हाधिकारी
हिंगोली खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विविध
स्टॉलला भेटी देवून संबंधित विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली, प्रातिनिधिक
स्वरूपात काही लाभार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्र, लाभांचे वाटपही यावेळी
करण्यात आले. तसेच विविध लाभार्थ्यांच्या समस्या ऐकून त्या निवारण करण्याच्या देखील
संबंधितांना सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
तहसील प्रशासनातर्फे सर्व मान्यवर व लाभार्थी यांचे
रोपटे भेट देवून स्वागत करण्यात आले. दि.01 ऑगस्ट, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय
हिंगोली येथे महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला असून दि.03
ऑगस्ट, 2023 रोजी 'युवा संवाद' हा कार्यक्रम आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे दुपारी
1.002 वाजता आयोजित केलेला आहे. युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नवनाथ
वगवाड तहसीलदार हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment