गांधी शांतता परीक्षेचे आयोजन
नशामुक्त भारत अभियानाचा उपक्रम
हिंगोली (जिमाका), दि. 14 : महामानव आणि राष्ट्रपुरुषांचे विचार
रुजविण्यासाठी नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात गांधी शांतता परीक्षा-2023
चे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित शाळा, महाविद्यालयात
विद्यार्थी-विद्यार्थीनींना सोमवार दि. 21 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा
परिषद समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गांधी
शांतता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
मुंबई सर्वोदय मंडळाच्या वतीने राष्ट्रपुरुषाचे चरित्र उपलब्ध करुन देण्यात येणार
आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारण्यात आले
आहे.
इयत्ता पाचवी ते सातवीसाठी दहा रुपये,
आठवी ते दहावीसाठी पंधरा रुपये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पंचवीस रुपये
इतके नोंदणी शुल्क मुंबई सर्वोदय मंडळाच्या वतीने सुनिश्चित करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक-प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने गांधी विचार गांधी शांतता परीक्षेत सहभागी
होता येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी सांगितले.
संबंधित शाळा महाविद्यालयात सोमवार,
दि. 21 ऑगस्टए 2023 पर्यंत नोंदणी शुल्क स्वीकारण्यात येणार आहे. गांधी शांतता परीक्षेत
सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे नशामुक्त भारत अभियानाचे
सचिव तथा समाज कल्याण प्रभारी सहायक
आयुक्त आर. एच. एडके म्हणाले. अधिक माहितीसाठी 9421804581 या भ्रमणध्वनीवर संपर्क
साधण्याचे आवाहन नशामुक्त भारत अभियान समितीने केले आहे.
****
No comments:
Post a Comment