7/12 तील लेखन प्रमादामुळे झालेल्या चुका
दुरुस्तीसाठी
ई-हक्क
प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.3 : महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 01 ऑगस्ट 2023
पासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. दिनांक 25 जुलै, 2023 च्या शासन निर्णयातील
विवरणपत्र-अ मधील निर्देशानुसार दि. 01 ऑगस्ट,2023 पासून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम
155 खालील कोणतीही प्रकरणे ऑफलाईन माध्यमातून न स्विकारता, नागरिकांकडून दाखल अशी
सर्व प्रकरणे ई-हक्क पोर्टलवर तलाठी मार्फत अथवा महा ई-सेवाकेंद्रामार्फत नोंदवून
तहसिलदारांकडे प्राप्त होणार आहेत. तहसील स्तरावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
कलम 155 ची प्रकरणे ऑफलाईन सुरु आहेत. त्या सर्व प्रकरणांची डेटा एन्ट्री
तलाठ्यांच्या मार्फत ई-हक्क पोर्टलवर दिनांक 10 ऑगस्ट, 2023 पुर्वी करण्यात येणार
आहे. जेणे करुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 ची सर्वच्या सर्व प्रकरणे
ही ई-हक्क पोर्टलच्या माध्यमातून तहसिलदार यांच्या स्तरावर जातील. तसेच तहसिलदार
यांच्या स्तरावर प्राप्त होणा-या प्रकरणांचा आढावा वरिष्ठ कार्यालयाचे स्तरावर
निर्गतीचे प्रमाण देखील सातत्याने आढावा घेवून संनियंत्रीत करण्यात येणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 खाली नागरीकांनी
आपल्या 7/12 तील लेखन प्रमादामुळे झालेल्या चुका दुरुस्तीसाठी अर्ज तलाठी अथवा महा
ई-सेवाकेंद्रामार्फत ऑनलाईन पध्दतीने ई-हक्क प्रणालीचा वापर करुन दाखल करावेत असे
आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकान्वये करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment