जिल्हा परिषद परिसरात
माझी माती माझा देश अभियानांतर्गत
वसुधा वंदन अमृत
वाटिकेचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ
·
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उर्त्स्फूत सहभाग
हिंगोली (जिमाका), दि. 10 : भारतीय
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी
मेरा देश’ अर्थात ‘माझी माती
माझा देश’अभियान दि. 9 ऑगस्ट,
2023 पासून सुरु
झाले आहे. भारतीय
स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असून या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त
मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियानांतर्गत येथील जिल्हा
परिषदेच्या परिसरात 750 देशी वृक्षांच्या रोपाची लागवड करुन अमृत वाटिका तयार
करण्यात येत आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन
करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, सामान्य प्रशासन विभागाचे
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी आत्माराम बोंद्रे, महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी गणेश
वाघ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ढवळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
डॉ.खुणे, प्रभारी कृषि विकास अधिकारी वाघमारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद
मुंढे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व
अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रत्येकी एका रोपाचे वृक्षारोपण
केले.
या कार्यक्रमासाठी पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी व्ही.
एस. भोजे यांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी त्यांना ग्रामपंचायत विभाग व सामान्य
प्रशासन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
******
No comments:
Post a Comment