14 August, 2023

 

अमृत महोत्सव व माझी माती माझा देश कार्यक्रमांतर्गत आदर्श महाविद्यालयात

पंचप्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन, राष्ट्रगान कार्यक्रम उत्साहात साजरा

 




 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येथील आदर्श महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव आणि माझी माती माझा देश कार्यक्रमांतर्गत पंचप्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन, राष्ट्रगाण इत्यादी कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले.  

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी माधव सलगर हे होते. यावेळी स्काऊट गाईड कार्यक्रम अधिकारी गावंडे, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव, उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव जाधव उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वृक्ष लावगड व वृक्ष संवर्धन याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी माझी माती माझा देश उपक्रमाची रुपरेषा सविस्तर विशद केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नामदेव सरकटे यांनी केले. शेवटी सामुहिक राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला आदर्श विद्यालय, आदर्श महाविद्यालय, सरजुदेवी आर्य कन्या विद्यालय, जिल्हा परिषद अनंले नगर, स्क्रेड हर्ट इंग्लीश स्कूल, जय भारत विद्यालय बळसोंड इत्यादी शाळेतील अडीच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

 

****

No comments: