हिंगोली, दि. १५ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खापरखेडा परिसरात भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का आज पहाटे ४. ५८ वा.जाणवला. या धक्क्याची नोंद भूकंपमापक केंद्रावर २.९ रिश्टर स्केल इतकी झाली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळवले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असेही कक्षाने कळवले आहे.

No comments:
Post a Comment