04 March, 2017

महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे वेळेत सादर करावेत
                                   -- प्रकल्प अधिकारी विशाल राठोड
हिंगोली, दि. 4 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे सन 2016-17 चे भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा फ्रिशीपचे अर्ज दि. 10 मार्च, 2017 पर्यंत भरून घ्यावेत.
महाविद्यालयांनी ई-ट्रायबल संकेतस्थळावर ऑनलाईन फिस विवरण भरून प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे दि. 10 मार्च, 2017 पर्यंत सादर करून मंजुर करून घ्यावेत.
भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे सर्व परिपुर्ण प्रस्ताव छाननी करून दि. 15 मार्च, 2017 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे सादर करावे. दि. 15 मार्च, 2017 नंतर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास सर्व जबाबदारी महाविद्यालयाची राहील.
वरील कार्यवाही बाबत सर्व महाविद्यालयांनी सहकार्य करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ***** 
पंचायत समिती सभापती-उपसभापती पदांच्या
निवडणुकांसाठी विशेष बैठकीचे आयोजन
हिंगोली,दि.4:  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 59(3) व 67 (3) अन्वये  येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी  यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदांची निवडणूक घेण्यासाठी दि. 14 मार्च, 2017 रोजी दुपारी 2:00 वाजता संबंधित पंचायत समितीची पहिली विशेष सभा आयोजित केली आहे.  खालील नमूद केल्याप्रमाणे अधिकाऱ्यांची त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदांसाठीची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.
अ.क्र.
पीठासीन अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम
पंचायत समितीचे नांव
विशेष सभेचे ठिकाण स
सभापती पदाच्या आरक्षणाचा तपशील
1
श्री. अनिल माचेवाड 
निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली
हिंगोली
पंचायत समिती, हिंगोली कार्यालयाचे सभागृह
अनुसूचित जमाती
2
श्री. अमोल येडगे,
स. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, कळमनुरी
कळमनुरी
पंचायत समिती, कळमनुरी कार्यालयाचे सभागृह
ना. मा. प्र. (महिला)
3
श्री. के.ए. तडवी
उपजिल्हाधिकारी (रोहयो), हिंगोली
सेनगाव
पंचायत समिती, सेनगाव कार्यालयाचे सभागृह
सर्वसाधारण (महिला)
4
श्री. लतीफ पठाण,
जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली
औंढा नागनाथ
पंचायत समिती, औंढा नागनाथ  कार्यालयाचे सभागृह
अनुसूचित जाती
5
श्री. गोविंद रणवीरकर,
उपजिल्हानिवडणूक अधिकारी, हिंगोली
वसमत
पंचायत समिती, वसमत कार्यालयाचे सभागृह
सर्वसाधारण
                                                                                                                                     
सदर पीठासीन अधिकारी हे सभापती -उपसभापती पदांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दि. 14 मार्च, 2017 रोजी सकाळी 10:00 ते 12:00 वाजेपर्यंत संबंधीत विशेष सभेच्या ठिकाणी स्वीकारतील.
विशेष सभेत पंचायत समिती सभापती / उपसभापती पदासाठीची निवडणूक ही महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्याअंतर्गत महाराष्ट्र जिल्हा परिषदा ( अध्यक्ष, उपाध्यक्ष विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती ( पंचायत समिती ( सभापती / उपसभापती) पदाचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 च्या तरतुदीनुसार घेण्यात येणार आहे. पीठासीन अधिकारी यांनी या पंचायत समितीचे सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पहिल्या सभेसाठी उपस्थित राहण्याबाबतची विहीत नमुन्यातील नोटीस सदस्यांना वेळेत विशेष दुतामार्फत संबंधित सदस्यांना पोहचविण्याची व्यवस्था करावी. तसेच सदर बैठकीनंतर निवडून आलेल्या सभापती व उपसभापती यांची नांवे व पत्ता सभेच्या कार्यवृत्तांच्या प्रतीसह सादर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहेत.

***** 

03 March, 2017

 उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांचा दौरा कार्यक्रम
हिंगोली,दि.३:- हिंगोली येथे जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या भूमीपूजन व पायाभरणी सोहळा उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते होणार असून, न्यायमुर्ती नलवडे यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहाणार आहे.
शनिवार दि. 4 फेब्रूवारी, 2017 रोजी न्यायमुर्ती नलवडे हे औरंगाबाद येथून दूपारी २ वाजता हिंगोलीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम करतील. रविवार दि. 5 फेब्रूवारी, 2017 रोजी  सकाळी १० वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सदर प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भुमीपूजन व पायाभरणी सोहळ्यास उपस्थित राहतील. दूपारी २ वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.
*****


जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

हिंगोली,दि.३: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात बुधवार,  दि. 8 मार्च, 2017 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका विधी समिती व जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने पीसी ॲन्ड पीएनडीटी ॲक्ट या विषयावर कायदेविषयक शिबीर / कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी‍ अनिल भंडारी यांच्या अध्यक्षेत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी‍ अनिल भंडारी अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा न्यायाधीश - 1 एम. पी. दिवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबासाहेब रोडगे, प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुजाता पाटील या महिला विषयक पोलीसांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर हे महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सेनगाव तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील या मनोधेर्य योजना या विषयावर तर महादेव हादवे हे पीसी ॲन्ड पीएनडीटी ॲक्ट या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 
                                                                        *****


जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोलीच्या नवीन इमारतीचे भूमीपुजन
हिंगोली,दि.३: जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या भुमीपूजन व पायाभरणी सोहळा उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते होणार आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सदर प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भुमीपूजन व पायाभरणी सोहळा रविवार, दि. 5 मार्च, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी नवी दिल्ली येथील भारतीय विधी परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश आ. देशमुख यांच्या उपस्थितीत आणि  परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मु. श्री. जवळकर यांच्या अध्यक्षेत संपन्न होणार आहे. यावेळी हिंगोली जिल्हा न्यायाधीश-1 म. पा. दिवटे आणि हिंगोली वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. शेख लालमियॉ शे. बाबामियॉ यांची प्रमुख  उपस्थिती राहणार आहे.  
या प्रस्तावीत हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयावी नविन इमारत ही हिंगोली येथील सर्व्हे क्र. 101 मधील पाच एकर दोन गुंठे एवढ्या प्रशस्त जागेत उभारण्यात येणार आहे. हि इमारत आधुनिक व सर्वसोयींनी युक्त राहणार असून प्रस्तावित इमारती मध्ये मुख्य इमारत तळ मजला आणि तीन मजले असणार आहे. याच बरोबर अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, संरक्षक भिंत, अग्नीशमन यंत्रणा, फर्नीचर, पाणी पुनर्भरण, बगीचा, वाहनतळ, साक्षीदारासाठी व्हीडीओ कॉन्फरंसींगची सोय इत्यादी सुविधा या इमारती मध्ये राहणार आहेत. ही नविन इमारत  30 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे.

*****
 

02 March, 2017

क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍यावतीने
 भांडेगाव येथे दोन दिवसीय महिला आणि किशोरींसाठी
आरोग्‍य जनजागरण अभियानाचे आयोजन
विवीध स्‍पर्धा, रॅली, मार्गदर्शन, प्रदर्शनी तसेच तपासणी शिबीराचा समावेश 
हिंगोली , दि. 02 - केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने जिल्‍हयातील भांडेगाव येथे माता-बाल आरोग्‍य, किशोरवयीन आरोग्‍य या विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय आरोग्‍य जनजागरण अभियानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दि. 03 आणि 04 मार्च रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अभियानात विवीध स्‍पर्धा, मार्गदर्शन, तपासणी शिबीर, रॅली,  प्रदर्शनी, माहितीपट प्रदर्शन, आदी उपक्रमांच्‍या माध्‍यमातून योजनांची जनजागृती करण्‍यात येणार आहे.
शुक्रवार दि. 03 मार्च रोजी  भांडेगाव येथील ग्रामपंचायत सभागृहात किशोरवयीन मुलींसाठी माहितीपटाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य विषयक माहिती देण्‍यात येणार आहे. तसेच महिला तज्ञाच्‍या माध्‍यमातून आरोग्‍य  विषयक मोकळया संवादाचे आयेाजन करण्‍यात आले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर त्‍यांची आरोग्‍य तपासण होणार असून मोफत औषधांचे वाटप देखिल करण्‍यात येणार आहे.
येथील सुखदेवानंद विदयालयाच्‍या विदयार्थीनींच्‍या सहभागाने संदेशात्‍मक रांगोळी स्‍पर्धा होणार असून अंगणवाडीच्‍या माध्‍यमातून शुन्‍य ते तीन वयोगटातील बालकांसाठी सुदृढ बालक स्‍पर्धा होणार आहे.
या दोन दिवसीय अभियानाच्‍या मुख्‍य कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. 04 मार्च रोजी मान्‍यवरांच्‍या उपस्‍थीतीत करण्‍यात येणार असून प्रारंभी सुखदेवानंद विदयालय आणि ग्रामस्‍थांच्‍या सहभागाने जनजागरण रॅली काढण्‍यात येणार आहे. तर आरोग्‍यतज्ञाच्‍या माध्‍यमातून माता- आरोग्‍य , किशोरवयीन आरोग्‍य  या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. तर आरोग्‍य आणि सामाजिक स्‍थीती या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे.  मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍नमंजुषा प्रतियोगिता घेण्‍यात येणार आहे. आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आरोग्‍य तपासणी शिबीर आणि औषधवाटप कार्यक्रमाचे तर बालविकास प्रकल्‍प विभागाच्‍यावतीने पोषण आहार प्रात्‍यक्षिकांच्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला भांडेगाव परिसरातील जनतेने मोठयासंख्‍येने उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन संचालनालयाचे सुमित दोडल,  संजय तिवारी, जिल्‍हा संगोपन अधिकारी डॉ. सतिष रूणवाल, बालविकास प्रकल्‍प अधिकारी गणेश वाघ आदींनी केले आहे.

****  

01 March, 2017

बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे मार्च महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 1 :  जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे मार्च - 2017 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 असे एकूण 1433 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        *****