01 June, 2017

पिक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा
                                                                -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
      हिंगोली,दि.01: खरीप हंगाम 2017-18 साठी शासनाने जिल्ह्यास 885 कोटी 25 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट दिले असून राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिल्या.            
            खरीप हंगाम जवळ आल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्रत्यक्ष भेट देवून पिक कर्ज वितरण बाबत आढावा घेतला. यावेळी हिंगोलीचे तहसीलदार श्री. विजय अवधाने यांची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, सन 2016-17 मध्ये शासनाने जिल्ह्यातील 80 टक्के  शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 1 हजार कोटी 38 लाख रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्टापैकी 762 कोटी 90 लाख रुपये पीक कर्जाचे 1 लाख 32 हजार शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले होते. परंतू यावर्षी म्हणजे सन 2017-18 मध्ये 1 हजार कोटी 41 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणांचे उद्दिष्ट आहे. याकरीता सर्व बँकानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2017-18 करीता पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होईल याची काळजी घेत कर्ज वितरण करावे.
            शेतकरी हा आपला अन्नदाता असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना अडचण निर्माण येता कामा नये. याकरीता सर्व बँकांनी संवेदनशील दृष्टीने शेतकऱ्यांचे हित सांभाळावे. लाभार्थी शेतकऱ्याला सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून देणे हे बँकांचे प्रथम कर्तव्य आहे, असेही जिल्हाधिकारी भंडारी यावेळी म्हणाले.
            बँक व्यवस्थापक यांच्याकडून पीक कर्ज वितरणांची सविस्तर माहिती घेत पीक कर्जाचे वितरण वेगाने करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी दिल्या. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत श्रावणबाळ योजनेचा निराधार लाभार्थ्यांना सुरु असलेल्या वितरणाची पाहणी ही जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी केली.
            खरीप हंगाम सन 2017-2018 अंतर्गत जिल्ह्यातील बँकांनी 29 मे, 2017 पर्यंत पुढीलप्रमाणे लाभार्थ्यांना पीक कर्जाचे वितरण केले आहे. यामध्ये अलाहाबाद बँकेने - 55 लाभार्थ्यांना 54 लाख, बँक ऑफ बडोदाने - 82 लाभार्थ्यांना 79 लाख, बँक ऑफ इंडियाने - 333 लाभार्थ्यांना 261 लाख, बँक ऑफ महाराष्ट्रने - 337 लाभार्थ्यांना 390 लाख,  कॅनरा बँकेने 65 लाभार्थ्यांना 62 लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने - 08 लाभार्थ्यांना 03 लाख, देना बँकेने - 04 लाभार्थ्यांना 11 लाख, आयडीबीआय बँकेने - 65 लाभार्थ्यांना 82 लाख, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सने - 01 लाभार्थ्यांना 2 लाख, पंजाब नॅशनल बँकेने - 07 लाभार्थ्यांना 08 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने - 567 लाभार्थ्यांना 729 लाख, सिंडिकेट बँकेने - 22 लाभार्थ्यांना 17 लाख, युको बँकेने - 11 लाभार्थ्यांना 07 लाख, युनियन बँक ऑफ इंडियाने - 26 लाभार्थ्यांना 122 लाख, ॲक्सिस बँकेने - 06 लाभार्थ्यांना 25 लाख, एचडीएफसी बँकेने 51 लाभार्थ्यांना 122 लाख, आयसीआयसीआय बँकेने 611 लाभार्थ्यांना 588 लाख आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेने - 282 लाभार्थ्यांना 239 लाख आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 5 हजार 891 लाभार्थ्यांना 1 हजार 15 लाख असे एकूण 8 हजार 424 लाभार्थ्यांना 38 कोटी 16 लाख रुपये बँकांनी पीक कर्ज वितरण केले आहे.
            पीक कृषी योजना ही शासनाची महत्वाची योजना असून, कृषी विम्याचा लाभ शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा असे म्हणत. राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत 2015-16 च्या रब्बी हंगामात पीक विमा संरक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील 31 हजार शेतकऱ्यांपैकी 27 हजार शेतकऱ्यांना 09 कोटी 60 लाख रुपये तर खरीप हंगामात पीक विमा संरक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील 3 लाख 35 हजार 166 शेतकऱ्यांपैकी 86 हजार 172 शेतकऱ्यांना 16 कोटी 26 लाख रुपये  नुकसानभरपाई (विमा परतावा) मिळणार आहे. याबाबतचा देखील आढावा जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी घेतला.
            पीक कर्ज वितरण आणि राष्ट्रीय कृषी विमा योजना संबंधी शेतकऱ्यांना अडचण असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे अवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले

*****
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 1 : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री श्री. महादेव जानकर हे दि. 03 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
शनिवार दि. 03 जून, 2017 रोजी दुपारी 1.00 वाजता गोपीनाथगड, पांगरी, ता. वैजनाथ, जि. बीड येथून शासकीय मोटारीने जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता हिंगोली येथे कै. ॲड. माधवराव नाईक यांच्या घरी भेट. सायंकाळी 5.00 वाजता हिंगोली येथून शासकीय मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

***** 
महसूल विभागातील प्रशासकीय बदल्या
        हिंगोली, दि.31: शासन निर्णय व शासन राजपत्रान्वये जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या आणि नविन नियूक्त्या  करण्यात आल्या असून त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.
अधिकारी-कर्मचाऱ्याचे नांव
कोठून
कोठे
उपविभागीय अधिकारी
1
प्रशांत कैलास खेडेकर,
परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी
--
परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी, कळमनूरी
2
विवेक काळे
परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी, हिंगोली
उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा
नायब तहसिलदार
1
एम.डी. बोथीकर, नायब तहसिलदार
उपविभागीय अधिकारी   कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय औंढा
2
बी. एन. सुरनर, नायब तहसिलदार
उपविभागीय अधिकारी   कार्यालय, कळमनूरी
तहसिल कार्यालय वसमत
3
एम. जी. खंडागळे, नायब तहसिलदार
तहसिल कार्यालय, औंढा
उपविभागीय अधिकारी   कार्यालय, हिंगोली
अव्वल कारकुन
1
एस. एम. तत्तापुरे, अव्वल कारकुन
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय, कळमनुरी
2
डि. के. कारगुडे, अव्वल कारकुन
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय, सेनगाव
3
एस. एम. कंठे, अव्वल कारकुन
तहसिल कार्यालय, हिंगोली
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
4
एस. बी. नाईकनवरे, अव्वल कारकुन
तहसिल कार्यालय, सेनगाव
तहसिल कार्यालय, औंढा
5
एस.के. खांडेकर, अव्वल कारकुन
तहसिल कार्यालय, औंढा
उपविभागीय अधिकारी  वसमत
6
एम. एस. वाकळे, अव्वल कारकुन
तहसिल कार्यालय, कळमनूरी
तहसिल कार्यालय, वसमत
लिपीक-टंकलेखक
1
एम. बी. वाडीकर, लिपीक
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय, वसमत
2
पी. एन. रणवीर, लिपीक
तहसिल कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय, सेनगाव
3
श्रीमती प्रतिभा रंगारी
जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली
तहसिल कार्यालय, कळमनूरी
4
आय. जी. शेट्टे
तहसिल कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय, कळमनूरी
5
श्रीमती. यु.यु. पालवे
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
तहसिल कार्यालय, सेनगाव
6
 श्रीमती ए. एम. भूसारे
तहसिल कार्यालय, वसमत
तहसिल कार्यालय, औंढा

                       

*****
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध 
            हिंगोली , दि. 31 : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्री व जुने लोकराज्य मासिकांची विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, अशा नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी त्यांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक मा. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस-6, हिंगोली या पत्यावर दि. 15 जून, 2017 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील . 
            रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील .

***** 
तरुण व पात्र प्रथम मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21 वर्षे) मतदार नोंदणी करण्यासाठी दिनांक: 01 जुलै, 2017 ते 31 जुलै, 2017 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले असून सदर विशेष मोहिम हिंगोली जिल्ह्यातील 92- वसमत, 93- कळमनुरी व 94- हिंगोली विधान मतदारसंघात उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे स्तरावर राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत दि. 8 जुलै, 2017 व दि. 22 जुलै, 2017 रोजी मतदार नोंदणी संदर्भातील विहीत नमुने स्विकारण्यासाठी मतदान केंद्राचे ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष शिबीराच्या दिनांक व्यतीरिक्त उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे मार्फत त्यांची कार्यालये, मतदान केंद्रे, शासकीय खाजगी शैक्षणिक संस्था (शाळा/ कॉलेज) येथे मतदार नोंदणी संदर्भातील विहीत नमुने स्विकारण्यात येतील. नमुना-6 मधील http://www.nvsp.in/ या पोर्टलव्दारे ऑनलाईन स्वरूपात सादर करता येतील. तसेच नविन तरुणांना ( 18 ते 21 वर्षे वयोगट) आपले नमुना-6 मधली अर्ज पोस्टाव्दारे सादर करता येतील.
या विशेष मोहिमेतंर्गत दि. 01 ते 31 जुलै, 2017 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन 18 ते 21 या वयोगटातील व्यक्तींकडून नमुना- 6 भरून घेण्यात येतील. या विशेष मोहिमेतंर्गत अधिकृत नोंदवही मधील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही संबंधीत यंत्रणांच्या सहभागाने करण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेतंर्गत प्राप्त होणारे नमुना 6 व 7 मधील सर्व अर्ज भारत निवडणूक आयोगाव्दारे तयार करण्यात आलेल्या ERO-Net या ऑनलाईन सॉफ्टवेअर व्दारे निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीतील नोंदी दुरूस्त करण्यासाठी व त्याच मतदारसंघात स्थलांतर करण्यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या अनुक्रमे नमुना 8 व नमुना 8अ मधील अर्जांची कार्यवाही ही विशेष मोहिम संपल्यानंतर करण्यात येणार आहे.
दि. 01 जुलै, 2017 रोजी ज्या भारतीय नागरीकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्याची जन्म तारीख दि. 01 जुलै, 1999 वा त्यापुर्वीची आहे व जो संबंधीत भागाचा सामान्य रहिवासी आहे अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी भरावयाचे नमुना 6 मधील व मतदार यादीतून नाव वगळणीसाठी भरावयाचे नमुना 7 मधील अर्ज दि. 01 जुलै, 2017 ते 31 जुलै, 2017 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे कार्यालये / सर्व मतदान केंद्रे आणि सर्व मतदार मदत केंद्रे येथे उपलब्ध आहेत. संबंधीत नागरीकाने योथोचित्तरित्या भरून स्वत: सादर केलेले अर्ज उपरोक्त सर्व ठिकाणी स्विकारले जातील.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 अन्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीचे अनुपालन करून, छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- 2017 अंतर्गत मयत झालेले मतदार, अन्यत्र स्थलांतरीत झालेले मतदार, तसेच दुबार नोंदणी असलेल्या काही मतदारंची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळण्यात आलेल्या आणि या मोहिमेतंर्गत वगळी करण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावांची यादी, उप विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (ERO)/ तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांची कार्यालये तसेच https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर मतदारसंघनिहाय व भागनिहाय उपलब्ध आहे.
कोणतीही व्यक्ती जे खोटे आहे असे तिला माहिती आहे किंवा जे खोटे आहे असे तिला वाटते किंवा जे खरे असे तिला वाटत नाही असे निवेदन किंवा प्रतिज्ञापन करील ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरेल.
हिंगोली जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार  नोंदणी अधिकारी यांचा तपशिल पुढिल प्रमाणे आहे.
अ.क्र.
मतदार संघ क्र. व नाव
मतदार नोंदणी अधिकारी
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी
1
92- वसमत
उप विभागीय अधिकारी,वसमत.
तहसिलदार, वसमत.
तहसिलदार, औंढा ना.
2
93- कळमनुरी
उप विभागीय अधिकारी, कळमनुरी.
तहसिलदार, कळमनुरी.
तहसिलदार, हिंगोली.
तहसिलदार, औंढा ना.
3
94- हिंगोली
उप विभागीय अधिकारी, हिंगोली.
तहसिलदार, हिंगोली.
तहसिलदार, सेनगाव.
अधिक माहितीसाठी  https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी .

*****
जून महिना हिवताप प्रतिरोध म्हणून साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 :  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून 2017 या महिन्यात हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी (डेंगू, चिकुनगुनीया, जे.ई., चंडीपुरा, हत्तीरोग इत्यादी) जनतेमध्ये जागृती निर्माण होणे. तसेच त्याचा प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अंमलबजावणी मध्ये सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाव्दारे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी म्हणजे जून महिण्यात साजरा करण्यात येतो. या जनजागरण मोहिमेमध्ये गांव पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिबंधात्मक विविध उपाय योजनाची माहिती योग्य त्या माध्यमाव्दारे पोहचविणे आवश्यक आहे. डासोत्पत्ती प्रतिबंध उपाय योजनामध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीची सभा, सर्व स्तरावरुन स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, बचत गटाच्या सभा, शिक्षकासाठी सामाजिक जाणीव, सर्वस्तरावरील अधिकाऱ्यानी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी जनजागृती जनतेमध्ये निर्माण करणे.
तरी हिंगोली जिल्हा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गांवपातळीवरील सदरील हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रतिज्ञा
मी शहराचा/गांवाचा
शहर/गांव माझे
शहराचे/गांवाचे आरोग्य चांगले ठेवणे,
आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.
याची मला जाणीव आहे.
स्वच्छ शहर/गांव, निरोगी शहर/गांव
मी शहरात/गांवात पाण्याची डबकी साचवु देणार नाही,
अशी डबकी वेळीच बुजवेन.
मोठ्या पाण्यासाठ्यात गप्पी मासे सोडण्यासाठी प्रयत्न करेन,
खिडक्याना डास प्रतिबंधक जाळ्या बसवेन,
झोपताना मच्छरदाणीचा वापर करेन,
डासापासून खबरदारी घेण्यासाठी इतरांनाही सांगेन,
घरावरील पाणीसाठ्याना व्यवस्थीत झाकून ठेवेन,
दर आठवड्याला घरातील पाण्याची मोठी भांडी रिकामी करेन,
स्वच्छ करेन, गुराचे गोठे स्वच्छ ठेवेन,
घराभोवती तसेच परिसरात टायर्स, प्लास्टीक वस्तु तसेच इतर निरुपयोगी वस्तु
साठणार नाही यांची दक्षता घेईन,
हे सारे करण्यात माझे आणि माझ्या शहराचे/गांवाचे हित सामावलेले आहे.
या छोट्या-छोट्या गोष्टीमुळे डासाची पैदास थांबेल.
डास आपल्याला चावणार नाहीत आणि मग डासामुळे होणारे हिवताप,
डेंगू, चिकुणगुणीया, हत्तीरोग, जपाणी मेंदूज्वरासारखे आजारही होणार नाहीत.
शहर/गांव रोगराई मुक्त होणे म्हणजेच शहराला/गांवाला आरोग्य स्वराज्य मिळणे होय.
आपले आरोग्य, आपल्या हाती
आपण रोखु, रोगाच्या साथी

                                                            *****   

31 May, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
हिंगोली, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, आदिसह प्रशासकीय इमारतीमधील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****