08 November, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 हिंगोली जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वपीठिकेचे निवडणूक निरीक्षक वंदना राव यांच्या हस्ते विमोचन
हिंगोली (जिमाका), दि 08: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा प्रशासन हे विधानसभेची निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून, त्याच अनुषंगाने प्रसार माध्यम कक्षामार्फत जिल्ह्यातील तीन मतदारसंघांची सन 1985 ते 2019 पर्यंतची पूर्वपीठिका- माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हा नियोजन समिती सभागृहात निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी 92- वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, 93- कळमनुरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रतिक्षा भुते, 94- हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएमच्या नोडल अधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी उपस्थित होते.
यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पूर्वपीठिका-माहिती पुस्तिकेचे कौतुक करत ही पुस्तिका सर्व प्रसार माध्यमे, अभ्यासकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचे सूतोवाच मान्यवरांनी केले. पूर्वपीठिकेमध्ये निवडणूक आदर्श आचारसंहिता, पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, तसेच मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या आणि सन 1985 ते सन 2019 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या निवडणुकांची सविस्तर माहिती संकलीत करण्यात आलेली आहे.
या पूर्वपीठिकेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या श्रीमती आशा बंडगर, कैलास लांडगे, प्राचार्य सुरेश कोल्हे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment