17 November, 2024
मतदार जनजागृती अभियानातून मतदारांमध्ये जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 17: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
मतदान करणे हा माझा हक्क आणि कर्तव्य आहे. ते करण्यास मी संकल्पित आहे ही भावना घेऊन जिल्ह्यातील विविध योग समित्यांकडून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
या मतदार जनजागृतीमध्ये मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करा, मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा, 85 वर्षे वयापुढील वयोवृध्द नागरिकांसाठी, अपंग आणि आजारी व्यक्तींसाठी घरच्या लोकांनी फॉर्म भरुन नोंदणी केल्यास मतदान अधिकारी घरी येऊन आपले मत नोंदवतील, आपल्या परिचयातील सर्वांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
सर्व सुजाण नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क आणि कर्तव्य आवश्य पार पाडावेत यासाठी आज हिंगोली शहरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीसाठी कुंडलिकराव निर्मले, माधुरी शास्त्री, विठ्ठल सोळंके, मन्मथ गुमटे, राजकुमार टिळे, प्रणत अग्रवाल यांनी यासाठी परिश्रम घेत आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment