11 November, 2024

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 11: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सेनगाव तालुक्यातील साखरा व कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र सिद्धार्थनगर, हिंगोली येथे 11 नोव्हेंबर रोजी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात आली. मतदानाविषयी घोषवाक्य तयार करण्यात आलेल्या फलकाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख शाहरुख शेख खाजा, कर्मचारी प्रदीप आंधळे, संतोष खडसे, गौतम खंदारे, शुभम पाटील, नामदेव शिंदे, वसंता पवार, इंदू बांगर, अनुपम तिगुटे, अर्चना लोणी, भाग्यश्री राऊत, देवकी भरकडे, सुजाता इंगोले व इतर कर्मचारी व आशाताई व मतदारांनी 100 टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. *******

No comments: