11 November, 2024
निवडणुकीसाठी नियुक्त मतदान पथकासाठी प्रशिक्षण
• जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले मार्गदर्शन
• प्रशिक्षणास गैरहजर सात कर्मचाऱ्यांना दिली नोटीस
हिंगोली (जिमाका), दि 11: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरु आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण आज वसमत येथील सुरमणी दत्ता चौघुले नाट्यगृह आणि बहिर्जी स्मारक विद्यालयात घेण्यात आले.
आजच्या प्रशिक्षण सत्रात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षणास व सुविधा मतदान केंद्रास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष-183, मतदान अधिकारी 183 व ईतर मतदार अधिकारी-366 पैकी 2 मतदान केंद्राध्यक्ष व 5 इतर मतदार अधिकारी असे एकूण 7 कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर होते.
प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना नोटीस निर्गमित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment