07 November, 2024

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवारांना आचारसंहिता पालनाच्या सूचना

हिंगोली (जिमाका), दि 07 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीत ईव्हीएम मशिन्स व्दितीय सरमिसळ, होम वोटींग, मतदान केंद्रावरील सोयी सुविधा, टपाली मतदान, ईव्हीएम कमिशनींग, आदर्श आचार संहिता व इतर निवडणूक अनुषंगीक महत्वाच्या प्रक्रियेबाबत सूचना व निवडणूक प्रकिया अंतर्गत होणारे कामकाजाची आवश्यक माहिती श्री. घुटुकडे यांनी दिली. या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ******

No comments: