17 November, 2024
विशेष निवडणूक निरीक्षक (पोलीस) दीपक मिश्रा यांच्याकडून निवडणूक कामाकाजाचा आढावा
हिंगोली, दि. 17 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त विशेष निवडणूक निरीक्षक (पोलीस) दिपक मिश्रा यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान व मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा व संबंधितअधिकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेशकुमार बन्सल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपस्थित होते.
मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र व परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. संवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक दक्षता घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र मतमोजणी केंद्रावर अतिशय सजगतेने घेऊन जावेत, अशा सूचना श्री. मिश्रा यांनी केल्या.
प्रारंभी दोन्ही जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक (पोलीस), जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी निवडणुकीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment