06 November, 2024

कळमनुरी विधानसभा मतदार संघात 7 सहाय्यकारी मतदान केंद्र निश्चित

हिंगोली (जिमाका), दि.06 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 29 ऑक्टोबर, 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी यादी भागाची पडताळणी केल्यानंतर मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 1500 पेक्षा जास्त झालेल्या मतदान केंद्रासाठी 7 सहाय्यकारी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्याचा मतदार केंद्रनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) भटसावंगी तांडा केंद्र क्र. 5 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटसावंगी तांडा खोली क्र. 1 येथे महिला 719 व पुरुष 809 असे एकूण 1528, 2) शेनोडी मतदान केंद्र क्र. 50 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेनोडी खोली क्र. 1 येथे महिला 714 व पुरुष 828 असे एकूण 1542, 3) कळमनुरी मतदान केंद्र क्र. 68 उर्ध्व पेनगंगा प्रकल्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनुरी खोली क्र. 1 येथे महिला 763 व पुरुष 768 असे एकूण 1531, 4) कळमनुरी मतदान केंद्र क्र. 69 जिल्हा परिषद उर्ध्व पेनगंगा प्राथमिक शाळा, कळमनुरी खोली क्र. 2 येथे महिला 754, पुरुष 776 व तृतीयपंथी 01 असे एकूण 1531, 5) कळमनुरी मतदान केंद्र क्र. 74 गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल खोली क्र. 2 कळमनुरी येथे महिला 769 व पुरुष 768 असे एकूण 1537, 6) औंढा नागनाथ मतदान केंद्र क्र. 185 नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ खोली क्र. 1 येथे महिला 687 व पुरुष 825 असे एकूण 1512 आणि आखाडा बाळापूर मतदान केंद्र क्र. 264 राजर्षी शाहू विद्यालय, आखाडा बाळापूर खोली क्र. 1 येथे महिला 743 व पुरुष 787 असे एकूण 1530 याप्रमाणे मतदारांची संख्या आहे. त्यामुळे वरील मतदान केंद्रासाठी सहाय्यकारी मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी मॅन्यूअल ऑफ पोलींग स्टेशन-2020 मधील तरतुदीचे पालन करुन सहाय्यकारी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले, असल्याची माहिती 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *******

No comments: