17 November, 2024
एसएसटी पथकाकडून 90 लाखांची रोकड जप्त
हिंगोली (जिमाका), दि. 17 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी स्थिर निगराणी (एसएसटी) पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील चिखली फाटा येथे नियुक्त केलेल्या या पथकाने आज दि. 17 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता मुंबईवरुन नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एमएच-23 एयु-7703 या वाहनाची तपासणी केली. एसएसटी पथक व पोलीस विभागाच्या या संयुक्त तपासणीमध्ये सदर वाहनातून 89 लाख 78 हजार 500 रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालय वसमत येथे जमा करण्यात आली आहे. याबाबतची पुढील कायदेशीर कार्यवाही अनुसरण्यात येत आहे.
या कार्यवाहीमध्ये नोडल अधिकारी जी. बी. पवार, हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे होते. ही कार्यवाही जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा दळवी, आचारसंहिता प्रमुख सुनिल अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाकडून करण्यात आली असल्याची माहिती 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment