14 November, 2024
‘स्वाधार’च्या अर्ज नूतनीकरणासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत • पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक
हिंगोली, (जिमाका) दि.14: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज www.hmas.mahait.org या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टींग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता 11 वी, प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार पर्याय निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाज कल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी 2024-25 या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात. त्यासाठी पोर्टलवर एक्झिस्टींग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज दि. 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. तसेच ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment