08 November, 2024
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि 08: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
आज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे मतदान जनजागृती करण्यात आली.
मतदानाच्या दिवशी नको दुसरा प्लॅन, केवळ मतदान, मतदान आणि मतदान अशा प्रकारच्या घोषवाक्य तयार करण्यात आलेल्या फलकाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, तालुका समन्वयक प्रकाश बर्वे, प्रदीप आंधळे, हर्ष मनवर, संजय भाकरे, सुनीता इंगोले, पांडुरंग कूड़े, महेश गायकवाड, गजानन देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment