13 November, 2024

न्यूमोनिया आजाराबाबत जनजागृती, कृती कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

हिंगोली, जिमाका दि.13: न्यूमोनिया आजाराबाबत सामाजिक जागरूकता व कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत न्यूमोनिया या आजाराबाबत सामाजिक जागरूकता व कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट, न्यूमोनियामुळे होणारे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच न्यूमोनियामुळे होणारे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी 28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या जिल्हास्तरीय कार्यशाळेस जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तथा सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. सुनील देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा परिषद संघ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा महाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे, डॉ. गजानन चव्हाण, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा सनियंत्रण मूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी, डॉ प्रशांत पुठावर, संदीप मुरकर, श्रीमती मनीषा वडकुते, सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ********

No comments: