12 November, 2024
निवडणुकीसाठी नियुक्त मतदान पथकासाठी प्रशिक्षण • प्रशिक्षणास गैरहजर 35 कर्मचाऱ्यांना दिली नोटीस
हिंगोली (जिमाका), दि 12 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरु आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण आज वसमत येथील सुरमणी दत्ता चौघुले नाट्यगृह आणि बहिर्जी स्मारक विद्यालयात घेण्यात आले.
आजच्या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष-182, मतदान अधिकारी 182 व ईतर मतदार अधिकारी-364 पैकी 6 मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 5 इतर मतदार अधिकारी, 21 इतर महिला अधिकारी असे एकूण 35 कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर होते.
प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 35 कर्मचाऱ्यांना नोटीस निर्गमित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment